कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना कोरोना लस द्या

0

अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे,अशातच शासनाने इयत्ता १२ वी बोर्ड च्या परीक्षा ऑफलाइन घेण्याची घोषणा केलेली आहे.

परीक्षांच्या आधी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना प्राधान्याने कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी जुक्टो संघटनेतर्फे प्रशासनाला करण्यात आली. अमळनेर तहसीलदार यांना याबाबतीत निवेदन देण्यात आले. निवेदन देताना प्रा.भलकार,सचिव प्रा. जी.एल.धनगर,खजिनदार प्रा.सी.आर.पाटील,प्रा.डी.एन.वानखेडे,प्रा.किरण पाटील,प्रा.बी.एस.शेलकर, तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.