ग्रामस्थांनी दिले वीज वितरण विभागाला निवेदन
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कनाशी गृप ग्रामपंचायत हद्दीतील सिंगल फेज सिलिंडर दुरुस्ती साठी राष्ट्रवादी पार्टी व सरपंच , ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत वीज मंडळाच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कनाशी गृप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सिंगल फेज सिलिंडर हे ५ च्या संख्येने खराब झाले असून वारंवार मागणी करून ही ग्रामस्थ, सरपंच व इतर सदस्यांना उडवा उडवी चे उत्तरे दिल्या जतात.
दिशाभूलहोत असून सर्व नागरिक त्रस्त झाले आहे. वीज मंडळा कडून होणाऱ्या त्रासाबद्दल अधिकारी, वायरमन, झिरो वायरमन जबाबदार आहे .त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी . व समस्या सोडवण्यात यावी अन्यथा वरील समस्या सोडविण्यासाठी दि २२ रोजा तहसीलदार कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावर हर्षल पाटील यांच्या सह ग्रामस्थांच्या साह्य आहेत. निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री अजित पवार , तहसीलदार , पोलीस निरीक्षक भडगाव यांना देण्यात आले आहे.