कनाशी- देव्हारी येथे 9 लाखांचा गांजा जप्त ; दोघांना अटक

0

भडगाव :- तालुक्यातील देव्हारी शिवारातील शेतामध्ये असणार्‍या घरात आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास पोलिसांनी सुमारे 437 किलो विक्री साठी साठवणूक  केलेला सुमारे 8 लाख 74 हजार रुपये किंमतीचा गांजा पकडला असून एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्याची हि जिल्ह्यातील पाहिलीच घटना असून  याप्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. यातील 1आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला आहे. या घटनेमुळे भडगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, गुप्त  माहितीनुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले ,अपर पोलीस अधीक्षक लोहित मतांनी ,चाळीसगाव विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी उत्तम कडलग ,यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे , चाळीसगाव पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड , स.पो.नि. रवींद्र जाधव , पोलिस उपनिरीक्षक आनंद पटारे , पो.ना. लक्ष्मण पाटील आदींच्या पथकाने देव्हारी ता. भडगाव शिवारात एका शेतामधील घरात धाड टाकून 437 किलो वजनाचा गांजा सुमारे 9 लाख 4 हजार रुपये किंमतीचा खतांच्या पोत्यांमध्ये भरून ठेवलेला आढळून आला . यासह 2 मोटारसायकल 2 मोबाईल,9 हजार रुपये रोख रक्कम यावेळी आरोपीकडून हस्तगत केले. यावेळी पोलिसांनी आरोपी 1) सुनील मोहिते, 2)संजय सरदार दोन्ही रा. देव्हारी ता. भडगाव या दोघांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून पसार झाला आहे . पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला आमली पदार्थ कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास स.पो.नि. रवींद्र जाधव करीत आहे.

दरम्यान यातील आरोपी सुनील मोहिते यांच्यावर  याच्यावर या पूर्वीही डिजे च्या गाडीत गांजा घेऊन जाताना पोलिसांनी पकडली होती. या नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. व जामिनावर बाहेर होता. या नंतर आज पुन्हा 437 किलो गांजा ची त्यावरच गुन्हा दाखल झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.