मुंबई – विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान काल सत्ताधारी मंत्री तसेच विरोधी पक्षातील दोन पाटलांमध्ये आरोप-प्रत्यारोपांनी चर्चेचा विषय ठरला होता. बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य प्रशासनाचा ४२ कोटींचा महसूल बुडवल्याचे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी समोर आणले.याच पार्श्वभूमी आज राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध केला. भ्रष्टाचाराविरोधात फडणवीस सरकारने सत्ता मिळवली. मात्र, भाजपचे १६ मंत्रीच भ्रष्टाचार करायला लागले तर राज्याचा कारभार चुकीच्या सरकारच्या हातात आहे. त्यामुळे अशा घोटाळेबाज सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.