कटनी, देवळाली, सुरत पॅसेंजरसह खान्देश एक्स्प्रेस आज रद्द

0

भुसावळ  | इटारसी – जबलपूर दरम्यान असलेल्या साेनतलाई व बागरटावा येथे रेल्वेलाइन दुहेरीकरण अाणि इंटरलाॅकिंगचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे रविवारी व साेमवार डाऊन (५११८७) भुसावळ – कटनी पॅसेंजर गाडी रद्द करण्यात अाली अाहे. तर कटनी-भुसावळ पॅसेंजर ही गाडी रविवारी रद्द केली हाेती. तसेच साेमवारी देवळाली शटल, सूरत पॅसेंजर, भुसावळ-बांद्रा खान्देश एक्स्प्रेस या गाड्याही भादली – जळगाव दरम्यानच्या ब्लाॅकमुळे रद्द करण्यात अाल्या अाहेत.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली ते जळगावदरम्यान असलेल्या तिसऱ्या लाइनसाठी स्टील गर्डर मंगळवारी टाकले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मंगळवारी (दि.१८) सकाळी ९.१० ते दुपारी १.१० या वेळेत चार तासांचा मेगाब्लाॅक घेण्यात अाला अाहे. यामुळे भुसावळ येथून सुटणाऱ्या देवळाली शटल, सूरत पॅसेंजर, भुसावळ-बांद्रा खान्देश एक्स्प्रेस या गाड्या साेमवारी रद्द अाहेत. स्टील गर्डरसाठी चार तासांचा ब्लाॅक घेतला अाहे. यामुळे अप-डाऊन मार्गावरील एकूण १२ गाड्यांना या कामाचा फटका बसणार अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.