कजगाव :-गेल्या वर्ष भरापासुन आपण सर्व कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करुन त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.शासन व प्रशासन वारंवार शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करावे.असे आवाहन गेल्या वर्षभरापासुन करीत आहे.मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली होती.
परंतु मध्यंतरी विवाह सोहळे,अंत्ययात्रा,धार्मिक कार्यक्रम,बाजारात होणारी गर्दी यामुळे कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे.याबाबतीत अधिक माहिती देतांना गोंडगाव येथील आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांनी सांगितले की कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे.दररोज वाढत जाणारे रुग्ण व होणारे मृत्यु हे बघता नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.औषधाचा तुटवडा,बेडचा तुटवडा व होणारे मृत्यु बघुन आता नागरिक कोरोनाबाबत गांभीर्यपुर्वक झालेले आहे.मी आरोग्य सेवक म्हणुन गेल्या वर्षभरापासुन फ्रंट लाईन वर्कर म्हणुन कार्य करतांना नागरिक शासकीय नियमांची खिल्ली उडवित होते.परंतु आता नागरिकांना कोरोनाची भयावह अवस्था समजु लागली आहे.
अनेक ठिकाणी आता नागरिक शासकीय नियमांचे पालन करतांना दिसत आहेत.बाजारात नागरिक मास्क लावुन भाजीपाला खरेदी करतांनाचे हे बोलके चित्र बघुन नागरिक आता कोरोनाबाबतीत गांभीर्यपुर्वक विचार करतांना दिसुन येत आहे.अशीच काळजी सर्वांनी घ्यावी.असे आवाहन सोनार यांनी केले आहे.