कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण ; जाणून घ्या पेट्रोल-डीझेलच्या किंमती

0

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या आहेत. मात्र, देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. शुक्रवारी दिल्लीतपेट्रोलची किंमत 90.78 रुपये तर डिझेलची किंमत 81.10 रुपये प्रती लिटर एवढी होती. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 97.19 रुपये तर डिढेलची किंमत 88.20 रुपये प्रती लिटर होती. मात्र, यापूर्वी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले होते.

दोन दिवसांत दिल्लीमध्ये पेट्रोल 39 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी सस्त झाले होते. तर गेल्या महिन्यात सलग 16 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या होत्या. साधारणपणे सर्वच शहरांत दोन्ही इंधनांच्या किंमती सातत्याने वाढत होत्या.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

नवी दिल्ली : 90.78 रुपये प्रतिलीटर

मुंबई : 97.19 रुपये प्रतिलीटर

कोलकाता  : 90.98 रुपये प्रतिलीटर

चेन्नई : 92.77 रुपये प्रतिलीटर

नोएडा : 89.08 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली : 81.10 रुपये प्रतिलीटर

मुंबई : 88.20 रुपये प्रतिलीटर

कोलकाता : 83.98 रुपये प्रतिलीटर

चेन्नई : 86.10 रुपये प्रतिलीटर

नोएडा : 81.56 रुपये प्रतिलीटर

कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या –

युरोपात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. गेल्या सत्रात बेंचमार्क कच्च्या तेलाच्या किंमती  4.3 टक्क्यांनी घसरल्या होत्या. ब्रेंट क्रूड 2.79 डॉलरच्या घसरणीसह 61.62 डॉलर प्रती बॅरलवर आले होते. यूएस वेस्ट टॅक्सस इंटरमीडियएट (WTI)ची किंमतही 5.2 टक्क्यांनी घसरून 57.98 डॉलर प्रती बॅरलवर आली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.