जामनेर (प्रतिनिधी):- शहरातील पाचोरा रोड वरील आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या महिलेला सलाईन लावत असताना खुद्द कंपाउंडर ने सदर महिलेच्या कानशिलात लगवल्याने काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशन मध्ये सदर कंपाउंडर विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुमरीन बी सैय्यद तौफीक राहणार बिस्मिल्ला नगर जामनेर ही महिला आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होती .दिनांक 17 रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास कंपाउंडर ज्ञानेश्वर पाटील राहणार शहापूर हा सदर महिलेला सलाईन लावत होता .त्यावेळी फिर्यादी महिलाही आरडाओरड करीत होती.
म्हणून सदर कंपाउंडर ने महिलेच्या उजव्या गालावर चापट मारली. यावरून सदर महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर पाटील याच्या विरोधात पोलिसात भादवि कलम 323 प्रमाणे अदखल पात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रियाज शेख करीत आहे. सदर महिलेला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले ,असून महिलेच्या नातेवाईकांनी आशीर्वाद हॉस्पिटल समोर रास्ता रोको केल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून जमाव नियंत्रणात आणला.
