Monday, September 26, 2022

कंपनीला भीषण आग; कामगारांनी पाचव्या मजल्यावरुन मारल्या उड्या.. (व्हिडिओ)

- Advertisement -

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

गुजरातच्या सुरतमध्ये  एका कडोडोराच्या विवा पॅकेजिंग कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुरतच्या एसडीएम यांनी सांगितले की, आग एका पॅकेजिंग युनिटला लागली. घटनास्थळी असलेल्या साधरण १२५ मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तर दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

- Advertisement -

- Advertisement -

अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत, माहितीनुसार, कामगार पाचव्या मजल्यावर काम करत असताना ही दुर्घटना घडली. आग लागल्याचे कळताच काही कामगारांनी कथितरीत्या आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या मारल्या. ज्यात दोघांचा मृत्यू झाला, तर सुमारे 125 कामगारांना हायड्रॉलिक लिफ्टने वाचवण्यात आले.

युनिटच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आग इतकी भीषण होती की, काही वेळात इतर मजलेही आगीच्या विळख्यात आली. इमारतीत अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाची टीम खिडक्या फोडून आत शिरले.

कामगारांनी पाचव्या मजल्यावरून उड्या मारल्या

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,  जेव्हा आग लागली तेव्हा अनेक कामगार पाचव्या मजल्यावर काम करत होते, आगीचे लोट वाढत असल्याचे पाहून कामगार खूप घाबरले आणि त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी पाचव्या मजल्यावरून उडी मारण्यास सुरुवात केली. सुरतच्या उच्च अधिकाऱ्यांनी याविषयी सांगितले की, आग आटोक्यात आणण्याबरोबरच मदत आणि बचाव कार्यावरही भर दिला जात आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असून घटनेची कारणे देखील शोधली जातील.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या