कंत्राटी कामगारांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

0
 भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील दिपनगर मध्ये 500 मेगा व्हॅट संच 2 व 3 मध्ये बऱ्याच कालावधी पासून विज निर्मिती थांबविली असल्याने कंपनी चालक कंत्राटी कामगारांना कुठलीही सूचना न देता चंद्रपूरला वारंवार जाण्याचे सांगत असल्याच्या त्रासामुळे  दिनांक 27 जानेवारी पासून कंत्राटी कामगारांनी बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे .
     याबाबत मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे कळविले आहे की ,  दिपनगर 500 मेगा व्हॅट प्रकल्पात   कार्यरत असलेल्या सॅनरोज टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये कंत्राटी कामगार गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहे.कंपनीला क्लोरीनेशन प्लॅन्टची निविदा दोन वर्षासाठी देण्यात आलेली आहे.परंतु संच 2 व 3 मध्ये बऱ्याच कालावधी पासून विज निर्मिती थांबविली असल्यामुळे कंत्राटी कामगार 500 मेगा व्हॅट मध्ये वर्ग करून सध्यास्थितीत काम करीत आहे.कामगारांना कुठलेही काही कारण नसतांना दिपनगरहून चंद्रपूरला जाण्याचे नियमबाह्य आदेश देण्यात आले आहे. आदेशाचे पालन करण्याकरीता कंपनी चालकाने प्रशासन व कामगारांना कुठलेही कारण नसतांना वेठीस धरून चंद्रपूरला वारंवार जाण्याचे सांगत असल्यामुळे कामगार हवालदिल झालेले आहे.कामगारांची व कुटुंबांची स्थितीच्या संदर्भात कंपनी चालकास व प्रशासनास लेखी व तोंडी विनंती करून देखील अद्याप पर्यत कामगारांना न्याय मिळाला नाही.तसेच कंपनी चालकाने मागील महिन्यात कामगारांकडून काम करून वेतनही दिलेले नाही.गेट पास जमा करा,चंद्रपुरला जा तरच वेतन देईल. नाहीतर वेतन मिळणार नाही असल्या प्रकारचे अफलातून गंभीर मार्ग अवलंबिल्यामुळे कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.वास्तविक पाहता संच क्रमांक 2 व 3 च्या कंत्राटी कामगारांना आमच्या कामावर पाठवून अन्यायासोबत कामगार कायद्याचे दिवसा ढवळ्या सर्रासपणे उल्लंघन चालविले असतांना देखील प्रशासनाने बघ्याची भूमिका घेणे व कंपनी चालकाच्या नियमबाह्य कृतीला समर्थन करण्या सारखे आहे. यासाठी
या अन्यायाविरुद्ध शेख इमरान शेख वहाब , शेख नाजिम शेख नासिर, सय्यद यूसुफ सय्यद अजीज यांच्यासह  कामगारांनी दिनांक 27 जानेवारी पासून बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.