Friday, August 12, 2022

कंडारीतील तरुणाची आत्महत्या

- Advertisement -

भुसावळ | प्रतिनिधी

- Advertisement -

तालुक्यातील कंडारी येथील नागसेन कॉलनीतील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय पवन सुभाष खैरे  या

- Advertisement -

- Advertisement -

युवकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे ठोस कारण कळू शकले नसलेतरी आरबीबी परीक्षेत मेरीटमध्ये न आल्याने नैराश्यातून या तरुणाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पवनने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच त्यास जामनेर रोडवरील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. पवनने अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण करीत रेल्वेची आरआरबीची परीक्षा दिल्याची माहिती आहे. मृत पवन हा कुटुंबातील एकुलता एक असल्याने त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात आली. त्याचे वडिल रेल्वेत लोको पायलट असून मृत पवनच्या पश्चात आई, वडिल व दोन बहिणी असा परीवार आहे.

पालिका दवाखान्यात  शवविच्छेदन करण्यात आले . शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या