मुंबई । अभिनेत्री कंगना राणावत व शिवसेनेतील वादात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही उडी घेतली आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केली. महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर घाईघाईनं केलेल्या कारवाईला राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आल्याचं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. शिवसेनेनं कंगनाला आपल्या राज्यात निघून जाण्याचा सल्ला दिला होता. या टीकेला उत्तर देत तिनं शिवसेनेलाच आव्हान दिलं होतं. त्यामुळं हा वाद चिघळला आणि मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केली.
दरम्यान, महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्य नव्हती. कंगनानं राज्य सरकारविरोधात वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्याविरोधात कारवाई करण्यात आली, असं राज्यपालांनी म्हटलं आहे. राज्यपाल कोश्यारी याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला पाठवण्याची शक्यता आहे.
राज्यपालांचा हा विषय नाही.त्यांना अनधिक्रुत बांधकामांना संरक्षण द्यावयाचे आहे का?
भाजपाने पुरावे नसतांना अनेकांना जेल मधे टाकले त्यावेळी राज्यापाल का बाेलत नाहीत.
फालतु नटी साठी एवढा कळवळा का?