भडगावच्या डॉ. निलेश पाटील, डॉ.पल्लवी पाटील या डॉक्टर दाम्पत्याचा नैसर्गिक पद्धतीची उपचार पद्धत
भडगाव (प्रतिनिधी) :भडगाव येथील ४ कोरोना बाधीत रुग्णांवर पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाचे येथील कोव्हिड सेंटरला उपचार चालु होते. या ४ रुग्णांवर भडगावचे डॉ. निलेश पाटील, डॉ. पल्लवी पाटील या डॉक्टर दाम्पत्याने रोज योगासन, ध्यान खेळ, सामुहीक संवाद साधला. या व्यतिरीक्त नैसर्गिक आहार, प्रकृतीनुसार रुग्णांना स्वनिर्मित अमृतरस व संजीवनी रस, विविध फळे, नारळपाणी दिले. हे स्वखर्चातुन केले. कोणत्याही पॅथीचे औषधीविना हे ४ रुग्ण ३ दिवसात निगेटीव्ह आले. हे रुग्ण कोरोना मुक्त झाले.
प्रशासनाने या कार्याची दखल घेत या प्रयोगाला प्रमाणीत केले आहे. भडगाव पॅटर्न हा कोरोना बाबतीत रुग्णांना उपचारासाठी देशभरात पॅटर्न ठरु शकतो. माञ प्रशासनाबाबत काहीशी नाराजीही व्यक्त करण्यात आली. माञ शासनाने १० रुग्णांची टेस्ट करुन घ्यावी. अजुन १० बाधीत रुग्णांची जबाबदारी आमच्यावर दिली तर आम्ही स्वखर्चाने व नैसर्गिक उपचार पद्धतीने रुग्णांना कोरोना मुक्त करुन दाखवु. अशी माहीती भडगाव येथील समर्पण हॉस्पिटल चे डॉ. निलेश पाटील व डॉ. पल्लवी पाटील या डॉक्टर दाम्पत्यांनी आयोजीत पञकार परीषदेत दिली.
कोरोना मृत्युचे कारण नाही. दुर्लक्षाने रुग्णाचा मृत्यु होतो. घरी राहुन प्रतिकार शक्ती वाढविणे हा पर्यायही आहे. सध्या जगभरात जे कोरोनाचे वातावरण चालले आहे. हे जागतिक कंपन्यांना धरुन केलेले षङयंञ आहे. असे आम्ही वैदयकीय सुञानुसार मानतो. असे ही पञकार परीषदेत डॉ. निलेश पाटील यांनी पञकारांसमोर मांडले. ही पञकार परीषद दि. २० रोजी दुपारी २ वाजता भङगाव येथील डॉ. निलेश सी. पाटील यांच्या समर्पण हास्पीटलवरील हाॅलमध्ये पार पडली. या पञकार परीषदेस डॉ. निलेश पाटील, डॉ. पल्लवी पाटील, निरज पाटील आदि उपस्थित होते. सुरुवातीस डॉ. पल्लवी पाटील यांनी आपण कोरोना बाधीत रुग्णांच्या उपचारासाठी जी मेहनत घेतली त्याची दखल प्रशासनाने घेतली आहे. भडगाव व बांबरुड महादेवाचे या दोघा कोव्हीड सेंटरमध्ये कोरोना बाधीत रुग्णांचे मनोधैर्य वाढावे म्हणुन सकाळी प्राणायाम, व्यायाम, सायंकाळी खेळ घेतले. रुग्णांचे मनोबल वाढले असे सांगीतले.
गेल्या एक महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील भडगाव कोविड केअर सेंटर ला डॉ. निलेश व डॉ. पल्लवी हे पाटील दाम्पत्य कोरोना बाधित रुग्णांना योगासन, ध्यान, विविध खेळ व सकारात्मक चर्चेद्वारे त्यांचे मनोधैर्य व प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत ६० ते ७० रुग्णांना विलगीकरण काॅरंटाईन काळात औषधींची गरज भासू न देता कमीत कमी कालावधीत रुग्णालयातून सुटी मिळाली.
डॉ.निलेश पाटील पञकारांशी बोलतांना म्हणाले कि, आमच्या या कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व प्रांत राजेंद्र कचरे यांच्या उपस्थितीत बांबरुड येथे चार रुगणांवर तीन दिवस नैसर्गिक उपचार पद्धतीने उपचार करण्याची परवानगी दिली. त्यापैकी दोन रुग्ण अनुक्रमे ६५ व ७० वर्षे वयाचे होते व दोघे फुफ्फुसांच्या न्यूमोनिया ने त्रस्त होते. या उपचार पद्धतीत योगासन, ध्यान, खेळ, सामूहिक संवाद याव्यतिरिक्त थ्री स्टेप नैसर्गिक आहार दिला. त्यामध्ये रुग्णाच्या प्रकृतीनुसार स्वनिर्मित अमृत रस व संजीवनी रस, विविध फळे व नारळपाणी देण्यात आले. विशेषत्वे, कुठल्याही पॅथीची औषधी देण्यात आली नाहीत. हे रुग्ण बांबरुड कोविड सेंटरला दिनांक ९ जून रोजी दाखल झाले. त्यांच्यावर नैसर्गिक उपचार ९, १० व ११ जून या तीन दिवसात करण्यात आले. १२ जूनला पुन्हा टेस्ट करण्यात आली. १४ जूनला प्राप्त झालेल्या टेस्ट रिपोर्ट मध्ये ४ पैकी ३ रुग्ण कोरोना निगेटिव्ह निघाले. विशेष म्हणजे निगेटिव्ह झालेल्या रुग्नांमध्ये वरील दोघेही वयोवृद्ध व न्यूमोनिया ग्रस्त रुग्नांचा समावेश आहे. प्रत्येक रूग्णास प्रति दिवस ६ ग्राम ‘क’ जीवनसत्व थ्री स्टेप डाएट च्या माध्यमातून देण्यात आले. त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक स्तरावर उपचार करण्यात आले. त्यामुळेच तिघेही रुग्ण केवळ तीन दिवसात कोविड निगेटिव्ह होऊ शकले. शासकीय कोविड सेंटर मध्ये अशा प्रकारे घेण्यात आलेला हा भारतातील पहिलाच यशस्वी उपक्रम आहे.
प्रशासनाने या कार्याची दखल घेऊन या प्रयोगाला प्रमाणित केले आहे. अशी माहीती डॉ. निलेश पाटील यांनी पञकार परीषदेत बोलतांना दिली. या बहुमोल कार्यात वैद्यकीय अधीक्षक व नोडल ऑफिसर डॉ. अमित साळुंखे (पाचोरा), वैद्यकीय अधीक्षक व नोडल ऑफिसर डॉ. पंकज जाधव (भडगाव) व डॉ. सूचिता आकडे (तालुका आरोग्य अधिकारी, भडगाव) यांनी मोलाचे सहकार्य दिले या त्यांच्या निरीक्षणाखालीच हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.असे डॉ. निलेश पाटील , डॉ.. पल्लवी पाटील यांनी पञकार परीषदेत बोलतांना माहीती दिली. माञ स्थानिक प्रशासनाने आमच्या कार्याची पाहीजे तशी दखल घेतली नसल्याबाबतही डॉक्टर दाम्पत्यांनी काहीशी नाराजीही व्यक्त केली.
डॉ. निलेश पाटील यांनी कोव्हिड सेंटरमधील रुग्णांसोबतचे काही अनुभवही कथन केले. ते म्हणाले कि, भडगाव येथील एका वयोवद्धाला राञभर खोकला येत होता. अडीच महीन्यापासुन हा वृद्ध खोकल्याने ञस्त होता. कोव्हीड सेंटरला हा वृद्ध खोकलत नसल्याने आम्हाला राञभर झोप येत नाही. अशा तक्रारी रग्णा, नागरीकांनी मांडल्या. डॉ. निलेश पाटील यांनी या वृद्धाला दोन ते तीन दिवस अमृत रस दिल्याने खोकला कायमचा दुर झाला असे सांगीतले. रुग्णांशी गप्पा मारीत, समस्या विचारीत आमचा संपर्कही वेळोवेळी आला. यावलच्या एका बाधीत नागरीकाने उपचारासाठी भडगाव कोव्हिड सेंटर स्वताहुन मागुन घेतले. या रुग्णावरही आम्ही नैसर्गीक पद्धतीनेच उपचार केले. या नागरीकाचा वाढदिवस असल्याने त्यांनी या कोव्हीड सेंटरमधील रुग्ण नागरीक, महीलांना पेढे वाटले. उरलेले २ पेढे आम्हा दोघा डॉक्टरांना दिले. आम्ही ते पेढे तात्काळ सर्वांसमोर खाल्ले.
या नागरीकाने तात्काळ उत्तर दिले डॉक्टर दादा तुम्हीही आमच्यासोबत पेढे खाल्ले. आम्हाला काहीच होणार नाही. आमची तब्येत बरी होईल समजा असे सांगीतल्याचा अनुभव डॉ. निलेश पाटील यांनी काही उदाहरणेही पञकार परीषदेत मांडली. प्राणायम, व्यायामाची नागरीक, महीलांना कोव्हीड सेंटरला सवय लागली. मनोधैर्य, मनोबलही वाढले. आजही घरी काही नागरीक, महीला आनंदात रोज प्राणायम, योगा करीत आहेत. अशीही माहीती डॉ. निलेश पाटील यांनी पञकार परीषदेत दिली. निरज पाटील यांनीही पञकारांशी चर्चा करीत आपले मत मांडले.