औरंगाबाद येथे ज्वेलर्समधील मॅनेजरने चोरले ५८ किलो सोने

0

औरंगाबाद :- येथील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शाखेत मॅनेजरने चक्क ५८ किलो सोन चोरून नेल्याची घटना घडली. 58 किलो दागिन्यांची किंमत जवळपास 21 कोटीच्या घरात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अंकुर राणे असे आरोपी मॅनेजरचे नाव आहे. शहरातील समर्थ नगर शाखेत ही घटना घडली. तसेच सहआरोपी लोकेश जैन याने शहरातील साडी व्यापारी लोकेश जैन आणि राजेंद्र जैन या दोघांच्या मदतीनं ही चोरी केली आहे. साडी व्यापारी लोकेश जैन याने मॅनेजर अंकुर राणेला हाताशी धरुन खोटी बिलं भरुन ही चोरी करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार चालू होता. या दोघांनी चोरी केलेले दागिने वेगवेगळ्या ठिकाणी विकले. या वामन हरी पेठे ज्वेलर्स शाखेच्या मालकांनी जेव्हा शाखेची पाहणी केली तेव्हा त्यांना काही दागिन्यांचा ऐवज कमी झालेला आढळला. या चोरीप्रकरणी औरंगाबाद  क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीप्रकरणी तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.