औरंगाबादमध्ये ५९ वर्षीय महिलेला करोनाची लागण

0

औरंगाबाद : पुणे, मुंबई नागपूरनंतर औरंगाबादमध्येही करोनाचा रुग्ण सापडला आहे. औरंगाबादाचा हा पहिला करोनाचा रुग्ण असून राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३२ वर पोहोचली आहे.
औरंगाबादमध्ये एका ५९ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. या महिलेचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला विलगीकरण कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. ही महिला रशिया आणि कझाकिस्तानचा प्रवास करून आली असल्याचं सांगण्यात येत. या महिलेला धूत रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण आढळल्याने येथील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.