ओव्हरटेकच्या नादात कारची दुचाकीला धडक

0

तीन तरुण जखमी, दुधाचा टँकर उलटला ; महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा

जळगाव –
राष्ट्रीय महामार्गावर समोरील ओव्हरटेक करण्याच्या पाळधीकडे जात असलेली कार जळगावकडे येत असलेल्या दुधाच्या टँकरला धडकल्याची रविवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली. बीबा नगर स्टॉपजवळ, हॉटेल साईपॅलेससमोर झालेल्या अपघातात कारमधील तिघे तरुण जखमी झाले आहे. उलटलेल्या टँकरवरुन दूध वाहून नेण्यासाठी तरुणांसह महिला पुरुषांची गर्दी उसळली होती.
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर जळगावहून कारने ( एम.एच 19 सी.एफ 7555) प्रशांत संताष सुर्वे 27), रुपेश गजानन पाटील (वय 22) दोन्ही रा. निवृत्तीनगर व पुष्पक दिनकर महाजन (वय 30 रा. गणेश कॉलनी ) पाळधीकडे जात होते. पुष्पकच्या मालकीची गाडी असून गाडी प्रशांत सुर्वे चालवित होता. खोटेनगर स्टॉपच्या पुढे बीबा नगरस्टॉपजवळ समोरील ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कार समोरुन शहरात येत असलेल्या दुधाच्या टँकरवर (क्र.एम.एच 11 7500) धडकली. यानंतर कारचा टायरफुटले. यात कारला वाचविण्याच्या प्रयत्नात ब्रेक दाबून वाहन रस्त्याखाली उतरविल्याने ट्रँकर रस्त्याखाली उतरण्याच्या प्रयत्नात उटलला. अपघात इतका जोरदार होता की , कारच्या समोरुन बाजूचा अक्षरशा चुराडा झाला आहे.
वाहनांच्या महामार्गावर दुतर्फा रांगा
रस्त्यातच पडलेल्या ट्रँकरमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे ईश्वर उमेश भांडारकर, मनोज पाटील, शैलेश चव्हाण, शाम पाटील, गजानन पाटील, शहर वाहतूकचे प्रशांत पाटील, शशीकांत मराठे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. काही वेळातच महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. हॉटेल एकवीराच्या बाजूने जळगावहून पाळधीकडे जाणार्या वाहनांची वाहतूक आली. कर्मचार्यांनी जैन इरिगेशनच्या क्रेन मशिन बोलाविले व टँकर बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.
चालक प्रशांत सुर्वेचा चेहर्याला दुखापत झाली असून पाय मोडला तर रुपेश हाताला दुखापत झाली आहे तसेच कारमालक पुष्पकचा हात मोडला आहे. तिघांना तातडीने मिळेत त्या वाहनातून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. याठिकाणी उपचारानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. चालक प्रशांत सुर्वे गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.