बंगळुरू : AMIMचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासमोर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाऱ्या देणाऱ्या तरुणीला पोलिसांनी अटक केलीय. अमुल्या असं या मुलीचं नाव असून पोलिसांनी तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय. अटकेनंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलंय. कोर्टाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात (CAA) बंगळुरूमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या अमूल्याला थांबवण्याचा ओवेसी आणि आयोजकांनी प्रयत्न केला. परंतु, ती थांबली नाही. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून अमूल्या हिला ताब्यात घेतलं. त्यानंतर अमूल्या हिला बंगळुरूच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय.