अमळनेर (प्रतिनिधी):-दिनांक १२ डिसेंबर २०१९ या दिवशी माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी आरक्षणा संदर्भान काही आदेश दिले होते . माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारला बजावून सांगितले होते की , “ लवकरात लवकर राज्य मागासवर्गीय आयोगाचे ‘ गठन करावे . राज्यातील ओबीसी समाजाचा ” Empirical Data ‘ जमा करून तो तत्काळ न्यायालयास सादर करावा . न्यायालयाच्या या आदेशाला जवळपास पंधरा महिने झाले मात्र आजूनही राज्य सरकारने साधे राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन देखील केलेले नाही . ही अत्यंत गंभीर बाब आहे.
१२ डिसेंबरला नंतर देखील सरकारला माननीय सर्वोच्च न्यायालयाने जवळपास दहा ते बारा तारखा दिल्या ! एकही तारखेला सरकार न्यायालयात हजर राहिले नाही . प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घातले नाही . गेल्या पंधरा महिन्यात , आमचे नेते व विधानसभेचे विरोधीपक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळपास पाच ते सात वेळा पत्राद्वारे सरकारला माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा च्या वतीने अनेक वेळा आम्ही सरकारला पत्र दिले . आमच्या एकही पत्रावर आपल्याकडून उत्तर आले नाही.
त्यावर कोणतीही कारवाई देखील करण्यात आली नाही . सरकारला विरोधकांची जराही किंमत नाहीच . मात्र ओबीसी समाजाला देखील तुम्ही क्षुल्लक समजत आहात एवढेच नाही तर सरकारकडून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा वारंवार अवमान केला गेला . याचाच फटका ओबीसी समाजाला बसला आहे . गेली पंधरा महिने सरकार फक्त कोर्टात जाऊन पुढची तारीख मागत होते . भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सरकारला चेतावणी देत आहे . लवकरात लवकर यावर ठोस कारवाई करा . तसे झाले नाही तर आमच्याकडे आंदोलना शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण आम्ही मिळवूनच राहू.
आमच्या ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार नाही , तोवर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा भाजपा तर्फे देण्यात आला अमळनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी मा.आ स्मिता वाघ, ऍड ललिता पाटील,प्रदेश सहसंयोजक व्ही आर पाटील,दूध संघ संचालिका भैरवी वाघ,तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,माजी सभापती श्याम अहिरे,सरचिटणीस जिजाब पाटील, राकेश पाटील,माजी अध्यक्ष शितल देशमुख,कु ऊ बा संचालक पराग पाटील, उपाध्यक्ष महेंद्र महाजन,चंद्रकांत कंखरे,महेंद्र पाटील,बापू हिंदुजा,गोकुळ परदेशी, दिलीप साळी, देवा लांडगे,पंकज भोई,योगीराज चव्हाण,समाधान पाटील,झाकीर खान,सौरभ पाटील, निखिल पाटील