Tuesday, August 16, 2022

ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी भाजपा ओबीसी मोर्चातर्फे आंदोलन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कालच निवडणूक आयोगाने  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तारीख केली. मात्र  निवडणूकापुर्वी ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चातर्फे निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.

भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, ओबीसी मोर्चा  महाराष्ट्र प्रदेश चिटणीस भारती सोनवणे, ओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, महानगर चिटणीस राहुल वाघ, नगरसेवक राजेंद्र मराठे, महेश चौधरी, मनोज काळे, मंडल अध्यक्ष अजित राणे, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्ष रेखा पाटील, महिला मोर्चा दिप्ती चिरमाडे, महिला सरचिटणीस रेखा वर्मा, क्रीडा आघाडीचे अरुण श्रीखंडे, ओबीसी उपध्यक्ष तृप्ती पाटील, चंदु महाले, विजय बारी, शांताराम गावंडे, अमित देशपांडे, युवा मोर्चाचे शुभम बावा, युवा मोर्चाचे सरचिटणीस मिलींद चौधरी, जितेंद्र चौथे, सचिन बाविस्कर, प्रथम पाटील, रितेश सोनवणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या