धरणगाव : राज्यातील ओबोसींच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे यासाठी धरणगाव येथे महात्मा फुले समता परिषदेने विविध ओबीसी समाजाच्या माध्यमातून तहसीलदारांना मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की धरणगाव येथे विविध ओबीसी समाजाच्या संघटना, समाज अध्यक्ष व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते,समता सैनिक मोठया प्रमाणावर उपस्थित राहून दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण, पूजन, संविधानाचे वाचन व २६/११ च्या शाहीदांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. पायी चालत
तहसीदार धरणगाव यांना निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिषदेचे तालुका अध्यक्ष धनराज माळी यांनी केले. सूत्रसंचालन आर. डी. महाजन यांनी केले. याप्रसंगी नगराध्यक्ष निलेश चौधरी, गुलाबराव वाघ, शालिग्राम मालकर, ज्ञानेश्वर महाजन, भानुदास विसावे, लक्ष्मण पाटील, सुनील चौधरी, छोटू जाधव, पडोळ सर यांनी मनोगत व्यक्त केले.