कोरापूत : ओडिशामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. दरम्यान, या चकमकीत ४ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. मृतांमध्ये तीन महिला व एका पुरुष नक्षलवाद्याचा समावेश असून घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात शस्त्रे आढळून आली आहेत.
रविवारी तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले तर अन्य एकाचा मृतदेह आज सकाळी सुरक्षा दलाच्या हाती लागला. डोकरी घाटात सुरक्षा दलाची शोधमोहीम अद्याप सुरूच आहे. शोधमोहीमदरम्यान जवानांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि नक्षली साहित्य मिळाले आहे. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले होते.