ओएलक्सवरून फर्निचर खरेदीच्या बहाण्याने 30 हजारांची फसवणूक

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  पेटीएमसह एटीएम कार्ड सुरू ठेवण्यासाठी मोबाईलमधील लिंक वा कोड विचारून फसवणूक करण्याच्या घटना शहरात ताज्या असतानाच ओएलक्स या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवलेला टेबल विकत घेण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी भुसावळातील 29 वर्षीय महिलेला 30 हजारात गंडवल्याची घटना 28 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता घडली. या प्रकरणी अज्ञात भामट्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार अंकिला गोपालदास सरीन (गजानन महाराज नगर, कोटेचा हायस्कूलजवळ, भुसावळ) यांनी ओएलएक्स या साईटवर सेंटर टेबल विक्रीसाठी टाकला होता. हा टेबल खरेदी करण्यासाठी मंगळवार 28 रोजी दुपारी मोबाईल क्रमांक 8059844372 व 819922536 या क्रमांकावरून फोन आला व त्यांनी टेबल खरेदी करण्यास सहमती दर्शवत फिर्यादीच्या मोबाईलवर क्यूआर कोड पाठवला व तो स्कून केल्यानंतर काही वेळातच खात्यातून २९ हजार ४५७ रुपयांची रोकड लंपास करण्यात आला. या प्रकरणी तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे करीत आहेत.भुसावळात सायबर गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांनी  सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.