ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा शेवटच्या बॉलवर पराभव

0

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर पराभव झाला आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करीत ७ गडी गमावून केवळ १२६ धावा करता आल्या. भारताने ठेवलेल्या १२७ रनचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १२७ रन केले. ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाला हे आव्हान पेलता आल्यामुळे ऑस्ट्रेलियाने ही मॅच ३ विकेटने जिंकली. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने २ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे

भारताचा जसप्रीत बुमराह हा सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला असून त्याने ४ ओव्हरमध्ये १६ रन देऊन ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट घेतल्या. तर युझवेंद्र चहल आणि कृणाल पांड्याला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने ४३ बॉलमध्ये सर्वाधिक ५६ रनची खेळी केली. के. एल. राहुलने ३६ चेंडूंमध्ये शानदार अर्धशतकी खेळी केली. धोनीने ३७ चेंडूंमध्ये २९ धावा पटकावल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.