ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफतर्फे 17 रोजी चक्का जाम

0

प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बैठकीत झालेला निर्णय

भुसावळ, –

अनेक वर्षांपासून विविध व प्रलंबीत मागण्या अद्यापही मान्य न झाल्याने या मागण्या  त्वरित मान्य करण्यात याव्यात अन्यथा 17 जून रोजी संपूर्ण भारतात चक्का आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा  येथील ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन तर्फे देण्यात आला  आहे .

स्थानिक श्रीकृष्ण चंद्र सभागृहात नुकतीच  बैठक घेण्यात आली . यावेळी नागपूर येथील जनरल सेक्रेटरी राव , सेंट्रल रेल्वे (झोनल )विभागीय अध्यक्ष एस आर मोरे , झोनल सचिव डी एस कोपरगावकर ,जॉईंट झोनल सचिव एम के त्रिपाठी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

यावेळी  मार्गदर्शनात एम पी देव यांनी  सांगितले की , आंदोलनाचा एक भाग म्हणून पुढील महिन्यात 15 व 16 जुलै रोजी 48 तासाचे उपोषण करण्यात येणार आहे . यावेळी  उपाशी राहून संपूर्ण भारतासह भुसावळ ब्रँच गाडी चालवून  ड्युटी करणार आहे या 48 तासात रेल्वे प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात येणार असून चक्का जाम  आंदोलन करण्यात येणार आहे

7 वे पे कमिशन नुसार वेतन भत्ता मिळावा , रनिंग स्टॅफ ला ओपीएस लागू करावा, 48 तास कामाचे तास कमी करावे यासह रेल्वे प्रशासनाने आरएसी 1980च्या पूर्व निर्धारित फॉर्म्युल्यानुसार किलोमीटर भत्ता द्यावा , सेवानिवृत्त कर्मचा-यांचे पेन्शन डिओपीटी ने काढलेल्या सेक्युलर प्रमाणे देण्यात यावे रिक्त स्थाने लवकर भरावीत , रनिंग स्टाफचे ड्युटी तास कमी करावे , रनिंग स्टाफला रेल्वेच्या सुरक्षित संचलनासाठी ओपीएस लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे

येत्या 15 व 16 जुलै रोजी 48 तास आंदोलन करण्यात येत असून आंदोलन यशस्वी व्हावे याकरिता महिन्याभरा पूर्वी पासूनच रूपरेषा व आखणी , कामकाजाची दिशा ठरविण्यात येत आहे . या दृष्टीने असोसिएशन कामाला लागले असून अक्टिव्ह झाले आहेत .तसेच 15 व 16 जुलै रोजी रेल्वे प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास भुसावळसह सर्वत्र एकाच दिवशी एकाच वेळी 17 जुलै रोजी चक्का जाम  आंदोलन करण्यात येणार आहे याकरिता संघटनेतर्फे सर्व प्रवासी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी शक्यतो प्रवास टाळावा बाहेर पडू नये व असोसिएशनला सहकार्य करावे असे आवाहन संघटनेचे विभागीय जॉईंट सेक्रेटरी एस.एम. बोकाळे यांनी केले आहे.

येथील बैठक यशस्वीतेसाठी भुसावळ ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ  असोसिएशन टीम ने परिश्रम

घेतले .

Leave A Reply

Your email address will not be published.