Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»क्रीडा»ऑलम्पिक जागरण राष्ट्रीय कार्यशाळा यशस्वी संपन्न
    क्रीडा

    ऑलम्पिक जागरण राष्ट्रीय कार्यशाळा यशस्वी संपन्न

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 6, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    ऑलम्पिक जागरण समीती व इकरा एच.जे. थीम महाविघालयात जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ऑलम्पिक जागरण एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा यशस्वी संपन्न  झाली. या कार्यक्रमाची प्रस्तावना क. ब. चौ. उ. म. विद्यापीठाचे  क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील सर यांनी  मनोगतात कार्यक्रमाची रूपरेखा मांडली.  तसेच कार्यक्रमाची व्याक्ती ही वाढत जात असुन जग जागजागृती ही अशीच कायम ठेवण्याचे आयोजन समिती प्रयत्न  करत आहे, असे त्यांनी सांगीतले.

    या कार्यक्रमासाठी टोकीओ जपानमध्ये ऑलिंपिक स्पर्धेत निरीक्षक म्हणुण गेलेले अशोक दुधारे सरांनी खास उपस्थिती देत आयोजन समीती व  खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच अशा  प्रकारचे कार्यक्रम घेण्याची गरज असल्याची सांगुन आयोजकांचे कौतुक केले . या प्रसंगी व्ही. एस. नाईक, महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. पी. व्ही. दलाल सर यांनीं सदर कार्यशाळा मिशन 2024 ऑलिंपिक समोर ठेवुन  नवोदित खेळाडूंना  प्रेरणा देण्याकरिता  ऑनलाईन  कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

    तसेच जास्तीत जास्त महाविद्यालयांनी  असे कार्यक्रम आयोजीत करावे . सदर  कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून डॉ.  अब्दुल करीम सालार यांनी मनोगतात सांगतले की, खेळाडूंना  शोधुन त्यांनां चांगल्या प्रशिक्षणाची सोय करून पुढे नेण्याचा प्रयत्न करायला हवा.  आपल्या देशात खुप प्रतिभाशाली खेळाडू  आहे.  त्यांची शोध घेण्याची गरज आहे.

    इकरा एस जे थीम महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. सयेद सुजाअत अली यांनीही मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला लाभलेले मुख्य मार्गदर्शक प्रा. डॉ. उदय डोंगरे, महाराष्ट्र शिवछत्रपती  अवार्ड प्राप्त यांनी ऑलम्पिक खेळाचा इतिहास त्याची व्याप्ती व आधुनिक ऑलम्पिक वाटचाल यावर सखोल असे मार्गदार्शन केले.

    तसेच तलवारबाजी ह्या खेळाचा इतिहास व त्याचा होणारा प्रसार व प्रचार या बाबत माहीती दिली व पुढील ऑलिंपिकसाठी जास्त खेळाळु सहभागी करण्याचा प्रयत्न  संघटनेच्या वतीने सुरू आहे.  अशी माहीती त्यांनी दिली.  सदर कार्यक्रमाला  नुतन मराठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. जे. पाटील जळगाव हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. ऑनलाइन पद्धतीने या  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

    महाराष्ट्रभरातून  खेळाडू, क्रीडा शिक्षक, शारीरिक शिक्षण संचालक,  प्राचार्य, प्राध्यापक व पालक इत्यादी क्रीडाप्रेमींनी या व्याख्यानमालेला मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्रा. डॉ. चाँद खान, तसेच आभार प्रदर्शन  प्रा. उमेश पाटील यांनी केले. प्रमुख मार्गदर्शकांचा  परिचय  प्रा. सुभाष वानखेडे  यांनी केला. ही  कार्यशाळा यशस्वी  करण्याकरिता, कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. दिनेश पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच ऑलीम्पिक जागरण समिती , इकरा एस जे थीम महाविदयालय, जळगाव , श्री व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर व  नुतन मराठा महाविद्यालय जळगाव  कार्यशाळेला संबंधित असलेले सर्वांनी परिश्रम घेतले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon news latest news Sport News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif