ऑनलाईन कल्याण-मिलन सट्टा खेळणारे, १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

जळगाव | प्रतिनिधी 

एमआयडीसी पोलिसांनी अवैध धंद्यावाल्यांविरुद्ध मोहीम सुरु केली आहे. आज पोलिसांना चक्क व्हाट्सअॅपवर कल्याण-मिलन सट्टा खेळणारे आढळून आले. याप्रकरणी तब्बल १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, विकार कयूम खान (रा. पंचशील नगर, तांबापुरा जळगाव) हा फुकटपुरा भागात त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमधील व्हाट्सअॅपमधून लोकांकडून कल्याण-मिलन नावाच्या मटक्याचे आकडे घेतांना मिळून आला. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी वसीम खान यांच्याकडे खान साहेब, अझरूद्दीन शेख, दानिश भाई, एमडी सलीम टेलर, अशपाक मुल्ला, साहिल बतीजा नावाच्या लोकांनी सुद्धा सट्ट्यांचा आकडा लावलेला असल्याने त्यांना सुद्धा सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. विकार खानकडून ९५० रुपये रोख आणि सात हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.