जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव येथील सौरभ संजय नारखेडे याची इंग्लंडमधील ऑक्सफर्ड ब्रुक्स विद्यापीठात ‘एमएस (फायनान्स)’साठी निवड झाली आहे. सौरभने पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.ई केले आहे. त्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी त्याने इंग्लंडमधील ऑक्सफर्ड ब्रुक्स विद्यापीठाची निवड केली.
येथे तो ‘फायनान्स’मध्ये उच्च शिक्षण घेणार आहे. तो गुरुवार, 13 जानेवारी रोजी इंग्लंडकडे प्रस्थान करणार आहे. एक अभ्यासू आणि कल्पक विद्यार्थी म्हणून तो कॉलेजमध्ये ओळखला जायचा. सौरभ हा निवृत्त मेल गार्ड प्रभाकर नारखेडे यांचा नातू, प्रख्यात केमिस्ट, जळगाव जिल्हा केमिस्ट असो.चे संचालक आणि केशवस्मृती सेवासंस्था समुहाचे संचालक संजय नारखेडे आणि जळगाव पीपल्स बँकेतील व्यवस्थापक मीनल नारखेडे यांचा पुत्र आहे.
‘बुद्धी आणि ज्ञान यात केलेल्या गुंतवणुकीची परतफेड खूपच अमर्याद असते’ अशा अर्थाच्या बेंजामिन फ्रँकलिन या तत्त्ववेत्त्याच्या विधानाने मला ‘फायनान्स’कडे आकर्षित केले. कारण त्याद्वारे भविष्यात समाजाला अधिक चांगली आणि विविधांगी वित्तविषयक सेवा देता येईल, असा त्याला विश्वास आहे. कारण जन्मच व्यावसायिक कुटुंबात झाल्याने हे बाळकडू त्याला जन्मतःच मिळाले आहे.
मोटरस्पोर्टस् आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील रुचीमुळेच सौरभने इंजिनिअरिंग मेकॅनिकलमध्ये केले. कॉलेजमध्ये असताना त्याने रेसिंग कारच्या डिझायनिंगपासून तो ती रस्त्यावर धावेपर्यंत प्रत्येक टप्प्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. अनेक जागतिक स्पर्धेतही तो सहभागी झाला होता. बी.ई केल्याबरोबरच त्याने मित्रांसमवेत ‘दि रेट्रो ब्लेझ कंपनी’ ची स्थापना केली होती. कंपनीत तांत्रिक जबाबदारीसोबतच अर्थविषयक व्यवहारही यशस्वीपणे हाताळल्याने त्याची रुची अधिक वाढत गेली.
‘गेक्सकॉन इंडिया’ या नॉर्वेच्या कंपनीत त्याने अनेक प्रकल्पांची देश-विदेशातील कंपन्यांसाठी तंत्रविषयक जबाबदारीही पार पाडली आहे. अर्थविषयक रुची आणि याच विषयात अद्ययावत ज्ञान प्राप्त करण्यासाठी मी ‘फायनान्स’ निवडले आणि अधिक प्रगत देश म्हणून इंग्लंड तर दर्जेदार विद्यापीठ म्हणून ‘ऑक्सफर्ड’ची निवड केल्याचे त्याने सांगितले. सौरभच्या या निवडीबद्दल त्याचे सर्वदूर अभिनंदन होत आहे.