ऑइल बनविण्याऱ्या कारखान्याला भीषण आग

0

सिन्नर (नाशिक): येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत टायर पासून ऑइल बनविण्याऱ्या कारखान्याला शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सकाळी साडेसात वाजेपर्यंत आग विझविण्यासाठी सहा अग्निशमन दलाचे टँकर शर्थीचे प्रयन्त करीत होते.

सुयोग कानडे व आशुतोष पानगव्हाणे यांच्या मालकीचा जनार्दन फियल नावाने जुन्या टायर पासून ऑइल बनविण्याचा कारखाना आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास आग लागली. सिन्नर, एमआयडीसी, रतन इंडिया, नाशिक व संगमनेर येथून अग्निशमन बंब बोलविण्यात आले. यात लाखों रुपयांचे नुकसान झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.