ऐतिहासिक संशोधन.. मानवी शरीरात डुकराचं ह्रदय धडधडणार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन

विज्ञान क्षेत्रामधून एक मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील डॉक्टरांनी डुकराच्या ह्रदयाची मानवी शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केलं आहे.

57 वर्षांच्या एका व्यक्तीवर अमेरिकेच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अनुवांशिक पद्धतीनं संशोधित करण्यात आलेल्या डुकराच्या ह्रदयाचं प्रत्यारोपण करण्यात आलं. ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील मोठं यश मानलं जात आहे.

अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल स्कूलने सोमवारी या संदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. डुकराच्या ह्रदयाचं मानवी शरीरातील यशस्वी प्रत्यारोपणाला ऐतिहासिक घटना म्हटलंय. प्राण्याच्या अवयवाचं मानवी प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेतील हा एक मैलाचा दगड मानला जात आहे. रुगण डेविड बेनेट यांची प्रकृती मानवी ह्रदय प्रत्यारोपणासाठी योग्य नव्हती. मात्र, त्यांचा जीव वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

यशस्वी ह्रदय प्रत्यारोपणानंतर डेविड बेनेट यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. शरीरात प्रत्योरिपत करण्यात आलेलं ह्रदय कसं काम करतंय याचं परिक्षण केलं जात आहे. डॉक्टर डेविड बेनेट यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. मेरिलँडमधील रहिवासी असलेल्या डेविड बेनेट यांनी शस्त्रक्रियेपूर्वीच्या एक दिवस अगोदर मला मरु द्या किंवा ह्रदय प्रत्यारोपण करा, असं म्हटलं होतं. ही हवेत गोळी मारण्यासारखी स्थिती असल्याची स्थिी होती.

मात्र, ती माझी शेवटची पसंती असल्याचं म्हटलं. गेल्या काही दिवासंपासून डेविड बेनेट हे हार्ट लंग बायपास मशीनचा वापर करत होते. आता ठीक झाल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडण्यास इच्छूक असल्याचं त्यांनी म्हटलंय. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं पारंपारिक प्रत्यारोपणासाठी शरीराची स्थिती योग्य नसलेल्या रुग्णांसाठी शेवटचा पर्याय म्हणून डेविड बेनेट यांच्यावरीलशस्त्रक्रियेला परवानगी दिली होती.

वैद्यकीय क्षेत्राच्या भविष्यासाठी फायदेशीर 

डेविड बेनेट यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या बार्टले ग्रिफीथ यांनी ही एक यशस्वी शस्त्रक्रिया होती, आणि प्रत्यारोपणासाठी आवश्यक असणाऱ्या अवयवांच्या कमी ला दूर करण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचं म्हटलं आहे. आम्ही काळजीपूर्वक पुढं जात आहोत. ही शस्त्र क्रिया भविष्यात जगातील रुग्णांसाठी आशेचा किरण निर्माण करेल, असं म्हटलंय.

मोहम्मद मोहिउद्दीन यांनी कार्डियाक जेनो ट्रान्सप्लांटेशन कार्यक्रमाची स्थापना केली होती. आतापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनाचं हे यश असल्याचं ते म्हणाले. बेनेट यांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आलेल्या ह्रदयावर अनुंवाशिक संशोधन करण्यात आलं होतं.

डुकराचं ह्रदय मानवी शरीरात प्रत्यारोपित करण्यासाठी 10 वेगवेगळ्या प्रकारच्या जिनोममध्ये ठेवण्यात आलं. सर्जरीपूर्वी हे ह्रदय अंग संरक्षण मशीनमध्ये ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या टीमनं पारंपारिक अँटी रिजेक्शन औषधांसह किनिकसा फार्मास्युटिकल्सनं तयार केलेल्या नव्या औषधाचा वापर केला होता.

अधिकृत माहितीनुसार अमेरिकेत सध्या 1 लाख 10 हजार लोक अवयवर प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी केवळ 6 हजार रुग्णांचा मृत्यू होतो. प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांचा जेनोट्रांसप्लाटेशनचा वापर करण्याकडे कल दिसतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.