एस.टी.बस पिकअप व्हॅनची धडक ; वाहन चालकासह २० प्रवाशी जखमी

0


 

पाचोरा | प्रतिनिधी 

जळगांवहुन पाचोरा येथे पाचोरा आगाराची बस सामनेर गावाजवळ येत असतांना समोरुन रिकाम्या पोत्यांचे गठ्ठे भरलेली महिंद्रा पिकअप या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस चालक महिंद्रा पिकअपला वाचविण्यासाठी गेला असता अचानक ब्रेक मारुन रस्त्याच्या कडेला बस उतरली गेल्याने बस मधील चालकासह २० प्रवाशी जखमी झाले. यातील चौघांना डोक्याला व डोळ्याजवळ मार लागल्याने त्यांना पाचोरा येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. केंद्र शासनाची टोल फ्री क्रमांक १०८ ही रुग्णवाहिका एक तास उशिरा आल्याने जखमींना क्रुझर मधुन उपचारासाठी आणण्यात आले. जखमींवर डॉ. सागर पाटील उपचार केले असुन घटने प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ४ रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान पाचोरा आगाराची बस क्रमांक एम. एच. १४ बी.टी. ०४४६ ही बस जळगांवहुन पाचोरा येथे येत असतांना सामनेर व पाथरी गावाच्या सिमे लगत एम. एच. १९ बी. एम. २७४९ महिंद्रा पिकअप ही रिकामे गोणपाठ (पोते) भरधाव वेगाने पाचोरा कडुन जळगांवकडे जात होती. महिंद्रा पिकअप वरील चालकाचा वाहना वरिल ताबा सुटल्याने ती बसवर जावुन धडकल्याने बस चालक नगराज दशरथ भागवत वय – ५२ रा. गिरड ता. पाचोरा, रामदास राघो पाटील वय – ७० रा. कृष्णापुरी (पाचोरा), कलाबाई भिमसिंग महाले वय – ५० रा. नगरदेवळा ता. पाचोरा, व जळगांव आगारात सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या मनिषा सुभाष बडगुजर वय – ३५ रा. कांचन नगर, जळगांव या चौघांना डोक्याला व डोळ्याजवळ गंभीर जखमा झाल्याने त्यांचेवर पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ज्योती संभाजी बाविस्कर रा. मानराज पार्क, जळगांव, संभाजी बाविस्कर रा. जळगांव, जनाबाई भगवानसिंग राजपुत, छाया प्रदिप राजपुत  दोघे रा. नागद ता. कन्नड, मिराबाई शंकर राठोड व शंकर नागराज राठोड रा. तळबंद तांडा ता. भडगांव, संगिता भागवत पाटील रा. मोहरन ता. चोपडा, कोकिळा तुकाराम पाटील व तुकाराम सिताराम पाटील रा. पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा, सुरेखा पाटील रा. देशमुखवाडी ता. चाळीसगाव, सविता शाम मोरे रा. अंजनविहरे ता. भडगांव, शेहबाज शेख कमरुद्दिन पटवे, विकास किरण कोळी रा. माहिजी ता. पाचोरा, यशवंत बाबुलाल पाटील रा. नगरदेवळा ता. पाचोरा, इंदुबाई काशिनाथ कुंभार रा. पिंप्राळा (जळगाव) यांना किरकोळ ईजा झाल्या आहेत. केंद्र शासनाची रुग्णवाहीका एक तास न आल्याने बसचालक नगराज दशरथ भागवत यांचे जावाई कोमल प्रकाश कंखरे हे जळगावहुन शिर्डी येथे जाण्यासाठी क्रुझरने जात होते. त्यांच्याच क्रुझरमधुन चौघ जखमींना पाचोरा ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.