जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोना काळानंतर घेतलेले हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे. यातून रोजगाराची संधी मिळाली असे, प्रतिपादन महापौर जयश्रीताई महाजन यांनी केले. एस. एम. प्रदर्शनीचा शुभारंभा प्रसंगी त्या बोलत होत्या.
शुभारंभाला सी ए असोसिएशनच्या माजी अध्यक्ष स्मिता बाफना, पीपल्स बँकेच्या बचत गटाच्या प्रमुख शुभश्री दप्तरी, आयोजक सरिता खाचणे, मुनिरा तरवरी यांची उपस्थिती होती.
महापौर जयश्रीताई महाजन यांनी सर्व स्टॉलला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. प्रदर्शनात कपडे, ज्वेलरी, मुखवास यांचे स्टॉल आहेत. तसेच बलून अनलिमिटेड तर्फे दोन भाग्यवान विजेत्यांना रुपये ५०० चे गिफ्ट व्हाउचर आहे.
तसेच आज उपवासाचे पदार्थ स्पर्धा झाली. तर शुक्रवारी तांदूळचे पदार्थ स्पर्धा आहे. प्रदर्शनाला महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शुक्रवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन सरिता खाचणे, मुनिरा तरवरी यांनी केले आहे.