‘एसबीआय’चा ग्राहकांना झटका ; डिपॉझिटवरील व्याजदर घटवलं

0

मुंबई : भारतीय स्टेट बँकेने डिपॉझिटवरील (ठेवी) व्याजदरात कपात केली आहे.  एसबीआयच्या या बदललेल्या व्याजदराचा लाखो ग्राहकांना फटका बसणार आहे. ‘एसबीआय’ ने ठेवीदर ०.१५ टक्क्याने कमी केला. दोन कोटींहून कमी रकमेच्या ठेवींवर नवे व्याजदर १० जानेवारीपासून लागू झाल्याचे बँकेने म्हटलं आहे.

यापूर्वीही बँकेने बचत खात्यावरील व्याजदर कमी केला आहे. १ नोव्हेंबर २०१९ पूर्वी एक लाखांपर्यंत शिल्लक असलेल्या बचत खात्यावर ३.५० टक्के व्याजदर होता. मात्र त्यात कपात करून तो ३.२५ टक्के करण्यात आला. एक लाखांहून अधिक शिल्लक असलेल्या बचत खात्यावर ३ टक्के व्याज आहे.

जाणून घ्या SBIचे एफडीवरील नवे व्याजदर 

>>7 दिवस ते 45 दिवसांची FD- एसबीआयच्या माहितीनुसार, आता 7 ते 45 दिवसांसाठीच्या एफडीचे नवे व्याजदर 4.5 टक्के राहतील.

– 46 दिवस ते 179 दिवसांची FD- आता 46 ते 179 दिवसांच्या एफडीवर 5.50 टक्के व्याज मिळतं.

– 180 दिवस ते 210 दिवसांची FD- बँक 180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर पहिल्यांदा 6 व्याज देत होतं. 10 सप्टेंबरपासून व्याजदरात 0.58 टक्के कपात केली आहे.

– 211 दिवस ते 1 वर्ष FD- SBIने 211 दिवस ते 1 वर्ष एफडीवरच्या व्याजदरावर 10 सप्टेंबर 0.20 टक्क्यांपर्यंत घटवलं आहे. या एफडीवर आता 5.80 टक्क्यांच्या हिशेबानं व्याज मिळणार आहे.

– 1 वर्ष ते 2 वर्ष FD- एसबीआयच्या आता 1-2 वर्षांच्या एफडीवर 6.10 टक्के व्याज मिळणार आहे.

– 2 वर्ष ते 3 वर्षांची FD- एसबीआयच्या आता 2-3 वर्षांच्या FDवर 6.10 टक्के व्याज मिळणार आहे.

– 3 वर्ष ते 5 वर्षांची FD- या एफडीवर SBI 6.10 टक्के दरानं व्याज देते.

– 5 ते 10 वर्षांची FD- या एफडीवर SBI 6.25 टक्के व्याज देते. तो आता 6.10 टक्के एवढं मिळणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.