जळगाव : कौटुंबिक वादात न्याय मिळत नसल्याने तसेच तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत हतबल झालेली संतप्त महिला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अश्विनी पंकज पाटील (वय २४) असे विवाहितेचे नाव आहे. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी फिरोज तडवी यांच्या वेळीच प्रकार लक्षात आल्याने त्यांनी तातडीने त्या महिलेला झाडावरून सुखरूप खाली उतरवले.
घटनास्थळी गेला पेठ पोलिस निरीक्षक अकबर पटेल स्थानिक गुन्हे शाखा कर्मचारी तसेच रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक याच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली महिलेला जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.
संबंधित विवाहिता ही जळगाव तालुक्यातील ममुराबाद जवळ असलेल्या एका गावातील आहे . पतीशी या महिलेचा वाद सुरू असून मुले ताब्यात देत नसल्याने तिने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे . यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने कंटाळून महिलेने सदरचा प्रकार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे