एसडी-सीडचा एकच ध्यास – विद्यार्थ्यांना शैक्षणिक आव्हानांशी स्पर्धा करण्यास सक्षम करणे

0

सुमारे ७४० विद्यार्थ्यांनी घेतला कार्यशाळेचा लाभ

जळगाव : एसडी-सीड मागील बारा वर्षांपासून आपल्या जळगाव जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. जिल्ह्यात बहुतांश जिद्दी व गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना परिस्थितीमुळे त्यांना अनेक समस्या येतात. त्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच या पिढीने जागतिक पातळीवर आव्हानांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम व्हावे  हा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवून वेगवेगळे उपक्रम एसडी-सीड मार्फत राबविले जात आहेत.

विद्यार्थ्यांना जर आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल तर पुस्तकी ज्ञानाबरोबरच आवश्यक जीवन कौशल्य असणे फार महत्वपूर्ण आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांच्यामध्ये जीवनावश्यक मुल्ये विकसित व्हायला हवेत तसेच विद्यार्थ्यांवर आपल्या मातृभाषेचा प्रभाव जन्मजात असतो. परंतु बाहेरील स्पर्धात्मक युगात त्याला टिकून राहण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांजवळ भरपूर प्रमाणात ज्ञान असूनही प्रभावी मुलाखत तंत्राच्या अभावामुळे विद्यार्थी पाहिजे त्या प्रमाणात जीवनात यशस्वी होत नाही. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी योग्य ध्येय निवळ केली पाहिजे आणि ते ध्येय पूर्ण करण्याची दुर्दम्य इच्छा शक्ती त्यांच्या मध्ये रुजावी त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित व्हावे, त्यांच्यात योग्य त्या जीवनावश्यक कौशल्यांचा विकास व्हावा, योग्य ध्येय निवड त्याला करता यावी आणि करिअर मध्ये स्थिर होण्यासाठी मुलाखत कौशल्याचा विकास व्हावा  या उद्देशाने एसडी सीड तर्फे “कौशल्य  विकास” व “इंग्रजी संभाषण कौशल्य”, “मुलाखत कौशल्य” ध्येय निश्चिती” या विषयावर सिद्धिविनायक उच्च माध्यमिक विद्यालय, के.सी.महाजन उच्च माध्यमिक विद्यालय व एस.एस.पाटील आय.टी.आय., शिवाजीराव सीताराम पाटील पॉलिटेक्निक, पी.ई.तात्या पाटील फार्मसी कॉलेज जळगाव येथे येथे प्रा सुरेश पांडे व श्री अभिजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. सुमारे ७४० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.

शहरी भागातील युवकांच्या मानाने ग्रामीण भागातील युवक त्यांना उपलब्ध सुविधांच्या कमतरतेमुळे मागे राहतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्यावेळेस ते नोकरी, उद्योगासाठी बाहेर पडतात तेव्हा त्यांना खऱ्या जगाची ओळख होते. ग्रामीण आणि शहरी विभागातील तफावत त्यांना अस्वस्थ करते. ती त्यांची अस्वस्थता दूर करण्याच्या हेतूने आणि त्यांचा परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने एसडी-सीड मार्फत वेगवेगळे कौशल्य विकास कार्यशाळा राबविल्या जातात.

कार्यक्रमाला प्राचार्य  खोडपे सर, प्राचार्य रोहित पाटील, प्राचार्य डॉ. अनुप कुलकर्णी, प्राचार्य भदाणे सर, सौ. इंगळे मडम, एसडी सीड समन्वयक प्रवीण सोनवणे तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.