Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»एसटी बसमध्ये कोरोना नसतो का? क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी भरून नियमांकडे दुर्लक्ष
    जळगाव

    एसटी बसमध्ये कोरोना नसतो का? क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी भरून नियमांकडे दुर्लक्ष

    By March 19, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव (रजनीकांत पाटील) : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विवाह सोहळे, अंत्यसंस्कार, दशक्रिया विधींसह गर्दी होणारे लहान-मोठे समारंभ अधिकाऱ्यांच्या रडारवर आहेत. दंडात्मक कारवाई सुरू आहे. प्रशासकीय दक्षतेच्या

    पार्श्वभूमीवर एसटी बसमधून सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

    कोरोनामुळे परिवहन महामंडळाने बससेवा दीर्घकाळ बंद ठेवली. नंतर अनेक नियमांना अनुसरून बस सुरू झाल्या. एका सीट वर एक प्रवासी, निर्जंतुकीकरण, मास्कचा वापर आदी बाबींकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले. मात्र, हळूहळू सर्वच घटकांमध्ये कोरोनाविषयक बेफीकरी आली.

    त्याला परिवहन महामंडळही अपवाद नाही. सध्या तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक सुरू असून, प्राथमिक नियमांकडेही दुर्लक्ष केले जात आहे.

    गाडीत कोरोना नाही का?

    बसमध्ये ज्यांना कोरोनाच्या गांभीर्याची कल्पना आहे, असेच प्रवासी मास्क लावून बसलेले आढळतात. उर्वरित मात्र कोरोना नष्ट झाल्याच्या आविर्भावात किंवा जिवावर उदार झालेले दिसून येतात.

    काही जण वाहकाने तंबी दिल्यावर तोंडाला रूमाल बांधतात. मात्र, नंतर काढून ठेवतात. अतिरिक्त प्रवासी भरल्यामुळे अनेकदा दोन प्रवाशांची क्षमता असलेल्या आसनावर तीन जण बसलेले पाहायला मिळतात. त्यामुळे

    फिजिकल डिस्टन्सच्या नियमाला पुरता हरताळ फासला जात आहे. खच्चून भरलेल्या बसमध्ये कोरोनाचा एक रुग्ण असेल, तर किती जण संसर्गित होऊ शकतील याचा विचार होणे आवश्यक आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif