मुंबई- लॉकडाउनमुळे गेल्या ५ महिन्यांपासून ठप्प झालेली राज्याची लालपरी अर्थात एसटी बस वेगाने धावू लागली आहे. मात्र, पगार थकल्यामुळे एसटी कर्मचारी हवालदील झाले आहे. अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबद्दल ट्वीट करून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.
‘एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत मी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.’ असे परब यांनी सांगितले आहे.