जळगाव : श्रमा साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय बांभोरी येथे दि. १६ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘स्वच्छता पंधरवडा’ साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन या पंधरवड्याची सुरुवात केली होती.
दरम्यान, १७ जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्ष लागवड करण्यात आली. स्वच्छता पंधरवडाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दि. २० रोजी पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. पी.आर. पुनासे व डॉ. एन.वाय. घारे यांनी केले. दि. २४ जानेवारी रोजी जलसंवर्धन ह्या विषवार घोषणा व पोस्टर स्पर्धा, दि. २५ रोजी महाविद्यालयातील वसतिगृह व स्टाफ क्वाटर्समध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच विद्युत अभियांत्रिकी विभागाने ‘वनसंवर्धन’ या विषयावर पोस्टर स्पर्धा घेतली.
दि. २७ रोजी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. स्वच्छता पंधरवडाचे प्रा. एम. व्ही. रावलानी हे समन्वयक होते. दरम्यान, स्वच्छता विषयावरील घोषणा स्पर्धेत प्रथम पल्लवी निकम, द्वितीय तेजस पाटील, पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये प्रथम सागर सपकाळ, द्वितीय शरयू चोपडेकर, जलसंवर्धन घोषणा स्पर्धेत प्रथम संपदा पवार, द्वितीय पूजा पाटील, पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा प्रथम नयना पाटील, द्वितीय रिता पाटील, तुषार पाटील, जलसंवर्धन विषयावर भाषण स्पर्धा प्रथम राखी मालू, द्वितीय पूजा पाटील, वनसंवर्धन विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा
प्रथम राणी चव्हाण, पूनम घाईत, द्वितीय जयश्री सपकाळे, कीर्ती कोळी तर टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धेत गटनिहाय प्रथम प्रवीण सोनवणे, अखलाख पटवे, रोहित धंद्रवे, प्रितेश चौधरी, सौरभ घोडके, सैफ देशमुख, द्वितीय क्रमांक रुपांक राजपूत, स्वप्नील पाटील, रुतुजा पाटील यांनी मिळविला.