एरंडोल :- आषाढी एकादशी निमीत्त येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुल या शिक्षण संस्थेत वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.चिमुकल्यांनी विठ्ठल रुख्मिणी व वारकऱ्यांचा वेष परिधान करुन शाळेपासून सुरुवात केली.शहरातील विविध मार्गांनी दिंडी नेण्यात येऊन दरम्यान गणेश तुकाराम महाजन,राहुल गोसावी या शिक्षण प्रेमी नागरिकांनी बच्चे कंपनीला बिस्किटं व चॉकलेट वाटप करुन त्यांना प्रोत्साहित केले.
पालखी सह बच्चे कंपनी ची सदर दिंडी नागरिकांचे लक्ष वेधुन घेत होती. दिंडीच्या समारोप प्रसंगी कैलास परशुराम महाजन,चेअरमन पंकज महाजन,रोहिदास पाटील,पी.जी.चौधरी,प्राचार्य वंदना पवार,गणेश महाजन यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य वंदना पवार,रीम्पल महाजन, विशाखा राजपुत,जयश्री भावसार व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.