एरंडोल – एरंडोल – येथे अहिर सुवर्णकार समाज मंडळातर्फे संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी बुधवारी 11 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष महेश देवरे यांच्या निवासस्थानाजवळ नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या हस्ते संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे मूर्तीचे पूजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर प्रतिमेची व मूर्तीची पालखी मिरवणूक सवाद्य काढण्यात आली मारवाडी गल्ली भगवा चौक मोठा माळीवाडा नागोबा मढी यामार्गे पालखी मिरवणूक नेऊन स्वामी समर्थ केंद्रात सांगता झाली.

या मिरवणुकीत अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सचिन विसपुते माजी अध्यक्ष महेश देवरे, गोरख मोरे, रामदास पिंगळे,शरद चोपडेकर, विनोद सोनार, विवेक मोरे, घनश्याम सोनार, मुकेश विसपुते, अरुण सोनार, आधी समाज बांधव, व भगिनी मुले मुली मोठ्या संख्येने पालखी मिरवणुकीत सहभागी झाले. पालखी मिरवणुकीची सांगता झाल्यावर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला

