Saturday, December 3, 2022

एरंडोल येथे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष

- Advertisement -

एरंडोल: – शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या महा आघाडीचे नेते तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर गुरुवार रोजी संध्याकाळी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल स्थानिक महाआघाडीच्या कार्यकर्त्यां तर्फे जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी कार्यकर्त्यां तर्फे शहरात मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले यानंतर भगवा चौक परिसरात कार्यकर्त्यां तर्फे उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात येऊन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. तसेच म्हसावद नाका परिसरात एलईडी स्क्रीन लावून उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या सोहळ्याचे चित्रीकरण दाखविण्यात आले याप्रसंगी संख्येने कार्यकर्त्यांनी शपथ विधी सोहळा पहिला.
याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश महाजन एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय महाजन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक डॉक्टर सुरेश पाटील जिल्हा उपसंघटक किशोर निंबाळकर विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड राजेंद्र महाजन रवींद्र जाधव रे वानंद ठाकूर परेश बिर्ला आनंदा चौधरी संजय भदाणे सुनील चौधरी सुनील मराठे सुभाष मराठे चिंतामण पाटील नगरसेवक दशरथ चौधरी मयूर वाणी राजू राठोड मेघराज महाजन राजेंद्र ठाकूर गणेश मराठे राजू भावसार इम्रान सय्यद अरुण महाजन गजानन पाटील अशोक महाजन नगरसेवक योगेश महाजन प्रदीप राजपूत राहुल महाजन प्रवीण महाजन गिरीश महाजन यांचेसह महाआघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या