एरंडोल येथे विद्यार्थ्यांसाठी व्हाट्सअप क्लासरूम शिक्षणाचा उपक्रम

0

प्रतिनिधी | एरंडोल येथील के.डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल व अकॅडमिक हाईट पब्लिक स्कूल  या शाळांमध्ये ” स्टडी फ्रॉम होम ” या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्हाट्सअप क्लासरूमची संकल्पना गटशिक्षणाधिकारी व्ही. एच. पाटील, संस्थाध्यक्ष अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य दीनानाथ पाटील यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील शाळा दि. २० मार्च पासून बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत, परंतु  शाळांना अचानक दिल्या गेलेल्या सुट्ट्यांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमातील शेवटचा काही भाग राहून गेला असून त्या अनुषंगाने ह्या व्हाट्सअप क्लासरुमचे “स्टडी फ्रॉम होम ‘ या उपक्रमांतर्गत आयोजन केले आहे.यात शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाईलवर व्हाट्सअप ग्रुप मध्ये प्रश्न देतात व त्याची उत्तरे फोटो काढून विशिष्ट वेळेमध्ये  पाठवायला सांगतात व त्यात काही चुकीचे असेल किंवा काही बदल करायचा असेल तर शिक्षक ते पाहून लगेच विद्यार्थ्यांना  रिप्लाय करतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे.व  त्यातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आनंद घेता येत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा टाइम टेबल याअगोदर देण्यात आलेले आहे.

व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून दररोज विद्यार्थ्यांना प्रश्न उत्तरे ,मार्गदर्शन, पालकांशी संवाद  केला जाते.या कामी शाळेचे शिक्षक महेंद्र पाटील , राहुल पाटील , शीतल पाटील, स्वाती पाटील, भामरे मॅडम, भोसले मॅडम , मेश्रामकर मॅडम व  शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रत्येक वर्गाचा वेगळा ग्रुप करून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न दिले जातात व त्यांना सहज रित्या व्हाट्सअप द्वारे मार्गदर्शन करण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून पालक वर्ग हा शिक्षकांची परिचित होत आहे आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती स्वतः बारकाईने पाहत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.