एरंडोल येथे मोफत अन्न धान्य मिळण्यासाठी नागरिकांची तहसिल कार्यालयात गर्दी

0

एरंडोल( प्रतिनिधी) : येथील तहसिल कार्यालयात आज दुपारी १२ वाजता काही केशरी कार्ड धारक महिला ग्राहकांनी आम्हाला मोफत धान्य का मिळत नाही आहे या बद्दल विचारणा करण्यासाठी गर्दी केली.होती परंतु स्थानिक पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे व नायब तहसिलदार एस.पी.शिरसाठ यांच्या मध्यस्थीने ही गर्दी कमी करण्यात आली.

दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे की शासनातर्फे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा मोफत तांदुळ शहरातील स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात येत होता.त्याअनुषंगाने आज काही केशरी शिधा धारक सुद्धा त्या दुकानांवर मोफत धान्य घेण्यासाठी गेले असता स्वस्त धान्य दुकानदाराने त्यांना मोफत धान्य देण्यास नकार दिला.त्यामुळे काही महिला आम्हाला मोफत धान्य का मिळत नाही आहे ? असा जाब विचारण्यासाठी तहसिल कार्यालयात आल्या परंतु त्याठिकणी निवासी नायब तहसिलदार एस.पी.शिरसाठ यांनी संबंधित महिलांना समजावुन सांगत तुम्हाला धान्य मे व जुन महिन्यात मिळणार असुन ते विकत घ्यावे लागेल असे सांगितले.यावेळी मनसे तालुका अध्यक्ष विशाल सोनार,गोकुळ वालडे,यांनी राज्यात कोरोना मुळे लोक बेरोजगार झालेले आहेत व केंद्र शासनाने दि.१५ एप्रिल पासून केशरी शिधा पत्रिका धारकांना मोफत धान्य व बी.पी.एल.धारकांना मोफत गॅस सिलिंडर मिळणार असल्याचे जाहीर केले होते.परंतु त्या बाबत काहीही हालचाल होत नसल्याचे सांगितले.तरी लवकरात लवकर केशरी शिधा पत्रिका धारकांना मोफत धान्य व बी.पी.एल.धारकांना मोफत सिलिंडर मिळावे अशी मागणी केली आहे.

शासनाने ठरविल्यानुसार येत्या मे व जुन महिन्यात केशरी शिधा पत्रिका धारकांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू ८ रुपये किलो प्रमाणे तर प्रतिव्यक्ती २ किलो तांदुळ १२ रुपये प्रमाणे वितरित करण्यात येणार आहे व सध्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा मोफत तांदुळ वाटप केला जात आहे
– तालुका पुरवठा अधिकारी संदीप निळे.

Leave A Reply

Your email address will not be published.