एरंडोल (प्रतिनिधी) : येथे कोरोना रोखण्यासाठी नगरपालिकेतर्फे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम 15 सप्टेंबर पासून राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. 15 सप्टेंबर पासून ते 26 ऑक्टोबरपर्यंत या मोहिमेअंतर्गत शहरातील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे शहरवासीयांनी कडून या मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद दिला जात आहे.
पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर पासून मोहिमेस प्रारंभ झाला असून 10 ऑक्टोबर पर्यंत हा टप्पा पूर्ण होणार आहे आतापर्यंत 40 टक्के कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे तीन कर्मचाऱ्यांचे पथक बनवून एकूण 23 पथकेही मोहीम राबवीत आहे त्यात 69 शिक्षक 5 पर्यवेक्षक यांचा समावेश आहे शहरात जवळपास कुटुंब संख्या दहा हजारापर्यंत आहे.
शहरात मसावद नाका धरणगाव चौफुली अमळनेर दरवाजा मरीमाता चौक या मोक्याच्या ठिकाणी नगरपालिकेतर्फे फलक लावून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे तसेच घंटागाडी द्वारे शहरात या मोहिमेस संदर्भात दवंडी दिली जाते.
दुसऱ्या टप्प्यात 12 ऑक्टोबर पासून 25 ऑक्टोबर पर्यंत कुटुंब सर्वेक्षणाचे काम होणार आहे सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी लोकनियुक्त नगरअध्यक्ष रमेश परदेशी मुख्याधिकारी किरण देशमुख कार्यालय प्रमुख संजय धमाल नगरपालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहे