एरंडोल येथे बेटी “बचाव बेटी पढाव” कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद

0

एरंडोल – एरंडोल- एकात्मिक बाल विकास सेवा योजना तर्फे शनिवारी २५ जानेवारी रोजी येथे पंचायत समितीचे उपसभापती अनिल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार तहसीलदार अर्चना खेतमाळीस, तालुका वैद्यकीय अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, गट विकास  अधिकारी मंजुश्री गायकवाड, नायब तहसीलदार शिरसाठ, बाल विकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील हे उपस्थित होते.

यावेळी शुभांगी चौधरी, मोराण कर, सोनाली यांची समयोचित भाषणे झाली. मंदार वडगावकर यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन सुनंदा चौधरी यांनी केले. यावेळी सपकाळे, बडगुजर, नाकवे, पारिरकर, सुतार महिला कर्मचारी व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.