एरंडोल (प्रतिनिधी) येथे पाच दिवसाचा जनता कर्फ्यू असून बुधवार जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी बस स्थानक परिसरातील एका देशी दारू दुकान वर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, मिलिंद कुमावत, राजेश पाटील, अनिल पाटील, पंकज पाटील, यांच्या पथकाने सकाळी दहा वाजेच्या सुमारास घाड टाकली. यावेळी शहरात जनता कर्फ्यू चालू असताना. देशी दारू विक्री करताना आरोपी असलम जब्बार शिकलकर याला रंगेहात पकडण्यात आले.
या कारवाईत ५ हजार ४४ रुपये किमतीच्या देशी दारूच्या ५२ बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे ड्राय डे च्या दिवशी व जनता कर्फ्यू च्या दिवशी मागच्या दरवाजाने, किंवा पुढील दरवाजा अर्धवट उघडा ठेवून सर्रास दारू विकली जाते अशा तक्रारी कित्येक दिवसापासून केल्या जात होत्या. त्याबाबत एरंडोल पोलिसांनी दखल घेऊन एका दारू दुकानावर कारवाई केली.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजू पाटील हे करीत आहे.