Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    • प्रसिद्ध हॉटेलचे किचन तपासले, थेट मेलेले उंदीर आढळले
    • शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल
    • ‘संस्कारी बाबूजी’वर फिल्ममेकर महिलेकडून बलात्काराचे आरोप
    • कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनस्थळी गोंधळ
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»एरंडोल येथे दोघांचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    एरंडोल येथे दोघांचा मृत्यू

    By March 15, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल (प्रतिनिधी) येथील गांधीपुरा भागातील महादेव मंदिराजवळ राहणारे सुरेश सखाराम कुदाळे (वय ४३) यांचा चुनाभट्टी परिसरातील अंजनी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.तर उत्राण गु.ह. येथील रहिवाशी रमेश रामचंद्र लोहार (वय ६५) यांचे प्रेत जहांगीर पुरा भागातील महादेव मंदिराच्या मागे आढळून आले. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.विशेष हे की दोघं अती मद्य प्राशन करणारे होते.

    याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन वरुन मिळालेल्या माहिती नुसार दि.१४ मार्च रोजी सकाळी आठ वाजे पूर्वी  एरंडोल शहरातील अंजनी नदीच्या जवळ असलेल्या चुनाभट्टी जवळ नदीच्या पाण्यात सुरेश कुदाळे यांचे प्रेत आढळून आले.दरम्यान सुरेश चे प्रेत हे अती मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले आहे.यावरून एरंडोल पोलीस स्टेशनला सुरेश यास अत्यंत दारु पिण्याची सवय असल्याने त्याने दारूच्या नशेत आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान उद्या दि.१५ मार्च रोजी सुरेश च्या मुलीचे लग्न होते.आज हळद होती.त्यातच सुरेश च्या मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.किशोर सखाराम कुदाळे यांच्या फिर्यादवरून एरंडोल पोलीस स्टेशनला अ.मु. रजि.नं. 11/2021 सी.आर.पी.सी. 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे तसेच एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह.येथील रहिवाशी रमेश रामचंद्र लोहार (वय६५) हे उत्राण येथील त्यांचा मुलगा सागर रमेश लोहार यांच्या कडे राहतात.ते थोडे वेडसर असुन त्यांना अत्यंत दारु पिण्याची सवय होती व ते नेहमी कोणालाही काही एक न सांगता घरातुन निघुन जात असल्याचे सागर याने फिर्यादीत सांगितले आहे.त्यांचे प्रेत आज दि.१४ मार्च रोजी एरंडोल येथील जहांगीर पुरा भागातील महादेव मंदिराच्या मागे आढळून आले.दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशनला त्यांचा मुलगा सागर रमेश लोहार यांच्या फिर्यादीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अनिल पाटील,संदिप सातपुते करीत आहेत.

    यावेळी गांधीपुरा भागातील रहिवाशांनी एरंडोल शहरात ये जा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या अरुंद पुलाचे रुंदीकरण व्हावे अशी मागणी केली आहे कारण नेहमी या पुलांवरून ये जा  करणाऱ्यांना पुलावरून चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.अनेक वेळेस लहान  बालक,वयोवृद्ध या पूलांवरून खाली पडली आहे.परंतु आजच्या घटनेने मात्र पुऱ्यातील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू

    July 20, 2026

    प्रसिद्ध हॉटेलचे किचन तपासले, थेट मेलेले उंदीर आढळले

    July 20, 2026

    शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif