एरंडोल ;- येथे तालुका शेतकरी संघ कार्यालयात शासकीय ज्वारी मका खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार चिमणराव पाटील यांचे हस्ते १९ नोव्हेंबर गुरुवार रोजी करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार अर्चना खेतमाळीस नगराध्यक्ष रमेश परदेशी सभापती अनिल महाजन माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर माजी सभापती दिलीप रोकडे शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील नगरसेवक कुणाल महाजन रवींद्र चौधरी अतुल महाजन परेश बिर्ला चिंतामण पाटील अमोल भावसार कुणाल पाटील गजानन पाटील नितीन बिर्ला गोविंदा राठोड दंगल पाटील शेतकी संघाचे चेअरमन निळकंठ पाटील वाईस चेअरमन संजय जाधव संचालक सुदाम पाटील आदींची उपस्थिती होती पुरवठा अधिकारी निळे, पुरवठा अव्वल कारकून ज्ञानेश्वर राजपूत, शेतकी संघाचे व्यवस्थापक अरुण पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.