एरंडोल (प्रतिनिधी) : येथे देशात सर्वत्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन व संचार बंदी आदेश आहे. अशा परिस्थितीत शहरातील गोरगरीब, गरजु, मजूर वर्गाला गुरुद्वारा कार्यकर्त्यांतर्फे जेवणाचे पाकीट घरपोच दिले जात आहेत, तसेच काही लोकांना गुरुद्वारा जवळच जेवणाची (लंगर) व्यवस्था दि.२२ मार्च पासून करण्यात आली आहे. गुरुद्वारा हायवेलगत असल्यामुळे उतारकरू, अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहन चालक, शेतातील पावरा समाज यांना बसून जेवण दिले जाते.
सदरची सेवा ही अखंडितपणे लॉक डाऊन संपेपर्यंत सुरूच राहणार आहे असे . गुरुद्वारा प्रमुख निर्भय सिंग व बाबा कर्तारसिंग यांनी सांगितले आहे.गुरुद्वारामध्ये या जेवण (लंगर) उपक्रमात गुरुद्वारा चे सर्व कार्यकर्ते स्वतः स्वयंपाक बनवतात व जेवणाचे वाटप देखील करतात व बाहेरून आलेल्यांना त्या ठिकाणी जेवण देखील देतात गुरुद्वारा च्या या सामाजिक उपक्रमाचे शहरात कौतुक केले जात आहे.