एरंडोल । प्रतिनिधी
एरंडोल-तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शेतकरी विरोधी विधेयक मागे घेऊन न्याय मिळावा यासाठी तालुका काँग्रेसतर्फे 2 ऑक्टोबर 2020 रोजी तहसील कार्यालयासमोर सकाळी दहा वाजेपासून बारा वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात व शेतकरी विरोधी विधेयकाबाबत घोषणा देण्यात आल्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय महाजन, संजय भदाणे शहराध्यक्ष, इमरान मुस्ताक सय्यद विधानसभा युवा अध्यक्ष, हिम्मतराव पाटील, बबन वंजारी ,भास्कर पाटील ,सुरेश कौतिक पाटील ,शेख सांडू हुसेन शेख मोहम्मद , पिंजारी जहीर प्रकाश ठाकूर, आर एस पाटील, सुरेश देशमुख, गोरख पाटील, काशिनाथ मिस्त्री ,सुनील गोविंदा पाटील, आधी काँग्रेस कार्यकर्ते निदर्शने व धरणे आंदोलनात सहभागी झाले
निवेदनात केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने संसदेत कुठल्याही प्रकारचे चर्चा न करता शेतकरी विरोधी तीन विधेयक संसदेत मंजुर करून घेतले. या नवीन आलेल्या काड्या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे.या विधेयकामुळे लाखो शेतकरी व शेतमजूर रस्त्यावर येतील या विरोधात शेतकरी विरोध करत असताना केंद्रातील हे निर्दयी व हुकूमशाही सरकार त्यांचा आवाज बंद करण्यासाठी करत आहे. या सरकारचा पूर्वानुभव पाहता ते संसदेत कोणत्याही प्रकारची चर्चा व संवाद न करता गरिबांवर व शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असा हा कायदा करत आहेत. या कायद्यामुळे शेतीही भांडवलदारांच्या ताब्यात जाणार असून शेता वर आधारित छोटे छोटे उद्योग व्यवसाय बंद पडणार आहेत. शेतमजूर देशोधडीला लागणार जैविक शेतीचा ऱ्हास होऊन रासायनिक शेती प्रक्रिया वाढून कामगार कष्टकरी या सर्वांना नष्ट करण्याचे काम व महापाप भाजप शासन करीत आहेत. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाची खरेदी हामी भवानी होणार नाही अशी भीती आहे. या अध्यादेशामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल तसेच यामुळे खासगी कृषी उद्योगपतींचा मनमानी असेल. या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पिकावर खासगी कंपन्यांची मक्तेदारी येईल तसेच याचा फायदा मोठ्या कंपन्यांना मिळेल उद्योगपतींना फायदा होण्यासाठी ही विधेयके आणली जात असल्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करीत आहोत ही विधेयके त्वरित मागे घ्यावी हुकूमशाही चालणार नाही असे निवेदनात नमूद केले आहे.
फोटो कॅप्शन
तालुकाध्यक्ष विजय महाजन यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते धरणे आंदोलन व निदर्शने करताना