एरंडोल (प्रतिनिधी) : येथील जोहरी गल्लीतील रहिवासी दीपक एकनाथ मराठे (वय २७ वर्ष) या शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या राहत्या घरात पत्राच्या छताच्या लोखंडी पाइपला नायलॉनची दोरी अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
मृत दीपक याची पत्नी माहेरी गेली होती. तर त्याची आई व भाऊ शेतात कामाला गेले होते. त्याच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती आहे. पीक कर्जाचे ओझे व सतत होणारे नापिकी यांना कंटाळून त्याने आपली जीवनयात्रा संपवली.याबाबत संदीप सुरेश महाजन यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सहाय्यक फौजदार प्रदीप चांदेलकर, व निलेश ब्राह्मणकर हे पुढील तपास करीत आहेत.